Headlines

💥श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कन्या पूजनाचा अनोखा उपक्रम

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्रोत्सव निमित्त आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण मध्ये १०८ मुलींचे कन्या पूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व उपशिक्षिका यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी सर्वप्रथम मुलींचे पाय…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…

Read Full News

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

हॅलो जनता न्यूज, यावल : शहरातील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर येथे राहणारे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८, मूळ रा. सेलू, जि. परभणी) यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (दि. २५) त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर दिसून न आल्याने व घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चांदीने गाठले सर्वात उच्चांकी दर, इतक्या हजारांनी वाढ…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा एकदा मोठे चढ-उतार दिसून येत असून चांदीच्या भावाने तब्बल झेप घेतली आहे. शुक्रवारी चांदीत तब्बल १,२०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा दर एक लाख ४० हजार २०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचला आहे. दुसरीकडे, सोन्याच्या भावात मात्र सौम्य घसरण झाली असून ६०० रुपयांची घट नोंदली…

Read Full News

💥 ब्रेकिंग : “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना, e-KYC सुविधा सुरू, इतके दिवस मुदत…

हॅलो जनता न्यूज, मुंबई, – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य मिळावे याकरिता आता e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी खास https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया सहज करू शकतील, अशी माहिती…

Read Full News

💥 जळगाव ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ईडीचा छापा, १३ तासांपेक्षा अधिक काळ तपासणी..

हॅलो जनता न्यूज, जळगाव : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांवर सक्त वसुली  संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तब्बल १३ तास चाललेल्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी साडेसहाला सुरुवात झालेली तपासणी रात्री साडेसातपर्यंत चालली. या कालावधीत ईडीचे १० ते १५…

Read Full News

पाचोरा : एम. एम. महाविद्यालयाचे प्रा. वासुदेव वले यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य निर्णय, मरणोत्तर देहदानाचा संकल्प.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथील एम. एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. वासुदेव वले यांनी आपल्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणादायी असा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प करून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. प्रा. वले यांनी आपल्या जीवनाचा एक नवा अध्याय उघडत मेल्यानंतरही इतरांना मदत करता येते,…

Read Full News

ब्रेकिंग : शेतकरी मरतोय अन् मुख्यमंत्र्यांच्या शयनकक्ष दुरुस्तीसाठी तब्बल २० लाख खर्च, खा. अमोल कोल्हे यांची टीका

हॅलो जनता न्यूज, मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान ‘वर्षा’ येथील शयनकक्ष दुरुस्तीसाठी तब्बल ₹२० लाखांचा खर्च करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अंदाजपत्रकातून समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. “शेतकऱ्यांसाठी वेगळे निकष, मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा ऐषआराम” अमोल कोल्हे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, पुणे : खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकर याला गुरुवारी जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या खेवलकरची जामिनावर सुटका होणार आहे. ‘पुणे शहर…

Read Full News

🚍पाचोरा ते तुळजापूर थेट एस.टी. बससेवा सुरू, भाविकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील भाविक भक्तांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. कुलस्वामिनी श्री क्षेत्र तुळजापूरकडे थेट जाणारी एस.टी. बससेवा आता पाचोरा येथून कायमस्वरूपी सुरू झाली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा शक्य झाली असून, भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातील हजारो भाविक दरवर्षी तुळजाभवानीच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION