हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक वादामुळे ती आईसोबत राहत होती. तिची आई नोकरी करत असल्यामुळे काही काळासाठी ती भुसावळ येथील मावशीच्या घरी राहण्यासाठी आली होती. मात्र, मावशी काही कामानिमित्त बाहेरगावी गेली असता, घरात फक्त पीडित मुलगी, तिचा काका आणि एक लहान भाऊ असे तिघेच होते. याच संधीचा फायदा घेत दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी काकाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्याच रात्री आरोपी पुन्हा घरी परतला आणि मध्यरात्री त्याने मुलीवर पुन्हा एकदा जबरदस्ती केली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, दि. १८ सप्टेंबर रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिने अखेर फोन करून तिच्या आईला आणि मावशीला सर्व प्रकार सांगितला. १९ सप्टेंबर रोजी आई आणि मावशी परत आल्यानंतर त्यांनी तात्काळ मुलीला सोबत घेऊन भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून भुसावळ येथील संशयित आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या….
🚨 सावदा शहरात जोरदार पाऊस; बाजारपेठेत पाणी साचल्याने नागरिक हैराण
💊 फार्मसी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
🚨 मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला; नेमक काय घडलं…
