Headlines

आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक तसेच मे. महाराष्ट्र विकास ग्रुप, नाशिक या संस्थांमार्फत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तरी…

Read Full News

🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील खैरागड, सुईखदान, गंडई जिल्ह्यातील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत स्थानिक तरुणाला अटक केली असून, त्यास छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, खैरागड पोलीस स्टेशन (जिल्हा खैरागड-सुईखदान-गंडई, छत्तीसगड) येथे भारतीय न्याय संहिता (BNS)…

Read Full News

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) — भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर भडगावचे उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी आज सुंदरबन फार्म, भडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कादिर खान यांनी सांगितले की, “गट…

Read Full News

महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील महिंदळे या छोट्याशा गावाचे भूमिपुत्र आणि जनमानसात लोकप्रिय अधिकारी सुदाम अमरसिंग परदेशी यांची नुकतीच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या या नियुक्तीबाबत संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदाम परदेशी यांनी यापूर्वी अंधेरी, मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहून…

Read Full News

🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यभरातील कापसाच्या बाजारभावात गेल्या आठवड्यापासून घसरणीचा कल दिसून येत आहे. राजकोट बाजार समितीतील आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात प्रती क्विंटल ७,२५१ रुपये एवढा असलेला कापसाचा सरासरी दर या आठवड्यात ४.२६ टक्क्यांनी घसरला असून, आता हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली गेला आहे. केंद सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी…

Read Full News

🛑ब्रेकिंग: शेतकऱ्यांना मोठा फटका, रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढणार…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढू शकतात. सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. चीनने १५ ऑक्टोबरपासून युरिया आणि विशेष खतांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने मर्यादित निर्यात पुन्हा सुरू केली होती, परंतु आता त्यांनी खतांचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे, ज्यामुळे केवळ भारतच नाही तर जागतिक बाजारपेठांवरही परिणाम झाला…

Read Full News

🛑ब्रेकिंग: ऐन दिवाळीच्या दिवशी भडगाव शहरात पावसाची हजेरी

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) : ऐन दिवाळीच्या दिवशीच भडगाव शहरात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (दि. 21) रात्री सुमारे सात वाजेच्या सुमारास अचानक तुरळक पावसाने भडगाव शहर आणि परिसराला झोडपून काढले. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या भडगावकरांना या पावसाने दिलासा दिला आहे. दिवाळीचा सण असल्याने शहरात बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होती. खरेदीसाठी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चाळीसगावचे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव, दि. २१ ऑक्टोबर – चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यात तसेच जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादा देशमुख यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तत्काळ त्यांना जवळच्या…

Read Full News

🛑ब्रेकिंग: गुढे-वडजी गटात भैय्यासाहेब पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

हॅलो जनता न्यूज, भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील गुढे-वडजी जिल्हा परिषद गटात येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ महायुतीतील हालचालींना वेग आला असून, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भैय्यासाहेब पाटील हे कै. बापूसाहेब पु. का. पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भडगाव तालुका शेतकरी…

Read Full News

🛑ब्रेकिंग: आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याने राज्यभरात खळबळ, नेमक काय म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचे प्रश्न अधिक गंभीर होत चालले आहेत. जरी राज्यातील वरिष्ठ नेते ‘महायुती म्हणूनच लढणार’ असा दावा करत असले तरी स्थानिक स्तरावर मात्र वेगळीच समीकरणं दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION