Headlines

🛑ब्रेकिंग: ऐन दिवाळीच्या दिवशी भडगाव शहरात पावसाची हजेरी

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) : ऐन दिवाळीच्या दिवशीच भडगाव शहरात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (दि. 21) रात्री सुमारे सात वाजेच्या सुमारास अचानक तुरळक पावसाने भडगाव शहर आणि परिसराला झोडपून काढले. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या भडगावकरांना या पावसाने दिलासा दिला आहे.

दिवाळीचा सण असल्याने शहरात बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे काही काळ तारांबळ उडाली. दुकानदारांनी मालाचे संरक्षण करण्यासाठी घाईगडबडीत तंबू, प्लास्टिक व इतर व्यवस्था केल्या. काही ठिकाणी पावसासह वाऱ्याचेही जोरदार झोत जाणवले.

या पावसामुळे तापमानात किंचित घट जाणवली असून वातावरणात गारवा पसरला आहे. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या पावसाने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि आनंद दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत. काही भागात अल्प प्रमाणात तर काही भागात मध्यम स्वरूपात पाऊस झाला.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्येही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे दिवाळीच्या सजावटी व फटाक्यांच्या विक्रीवर थोडासा परिणाम झाला असला, तरी एकूणच या अवेळी पावसाने भडगावकरांना उन्हाच्या त्रासातून दिलासा मिळाल्याचे दिसून आले.हसत खेळत दिवाळी साजरी करत असताना पावसाच्या या झडीनं सणाला एक वेगळं रंगतदार वळण मिळालं, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : चाळीसगावचे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

🛑ब्रेकिंग: गुढे-वडजी गटात भैय्यासाहेब पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

🛑ब्रेकिंग: आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याने राज्यभरात खळबळ, नेमक काय म्हणाले…

2,113Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION