हॅलो सामाजिक

💥 ब्रेकींग – त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

हॅलो जनता, नाशिक दि. ३० – नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या त्र्यंबकेश्वर नगरीला राज्य सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्रदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्र्यंबक नगरपरिषदेच्या विकासाला नवे आयाम प्राप्त होणार असून, विशेषतः येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरीचा सर्वांगीण विकास वेगाने साधला जाईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

त्र्यंबकेश्वर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यामुळे पर्यटनवाढीचा मोठा फायदा होणार असून, पर्यटक व भाविकांसाठी खालील क्षेत्रांमध्ये ठोस सुधारणा होणार आहेत. यात पायाभूत सुविधा उभारणी स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थेचा सुधार, सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन असा सुविधांचा विकास केला जाणार आहे.

या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर नगरी धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अधिक समृद्ध, आकर्षक आणि पर्यटकांसाठी सुसज्ज बनणार आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी स्वतंत्र निधी व विशेष योजना राबविण्याचे संकेत दिले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या….

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आताच ई-पीक पाहणी नोंदणी करा अन्यथा….

💥ब्रेकिंग : आरोग्य विभागाचे सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड, जिल्हयात वर्षभरात ७५८ बालविवाह

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button