Mahavitaran : महावितरणने वीजबिलांवर अजूनही उद्धव ठाकरे यांचा फोटो
हॅलो जनता न्युज, जळगाव :
महावितरणने (Mahavitaran) जानेवारी महिन्यात वितरित केलेल्या वीजबिलांवर अजूनही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापला आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली असली तरी, वीजबिलावर सध्याही उद्धव ठाकरे यांचा फोटो दाखवला जात आहे.
महावितरणकडून दर महिन्याला वीजबिलाची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवली जाते. नवीन सरकारच्या फोटोसहित नवीन स्टेशनरी महावितरणने छापली असली तरी, मक्तेदाराने शहरात तब्बल चार हजार वीजबिले जुन्या कागदावर छापली आहेत. त्यामुळे याबाबत चौकशी सुरू केली असून, मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महावितरणने (Mahavitaran) नव्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसहित वीजबिलाचा फॉरमॅट तयार केला होता. दर महिन्याला या नवीन फॉरमॅटचे प्रिंट मक्तेदाराला पुरवले जाते. शहरात एक लाखाहून अधिक ग्राहक असून, त्यानुसार मक्तेदाराला वीजबिलांची प्रिंट दिली जाते.
सूचनेनुसार कारवाई सुरू केली असून, मक्तेदाराला नोटीस देण्यात आली आहे. याबाबत अधीक्षक अभियंता कार्यालयाला कळवण्यात आले असून, मक्तेदाराचे उत्तर आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार आवश्यक कारवाई केली जाईल.
— गोपाळ महाजन, कार्यकारी अभियंता, महावितरण, जळगाव.
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना : सत्तेतील बदलांनंतर कारवाई, अपात्र लाभार्थ्यांची रक्कम परत !
Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !
Suresh Dhas : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची महत्त्वाची माहिती