ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकआधीच भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांवर नाराज, ५ वर्षात झालेल्या त्रासाचा वाचला पाढा…
आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटलांचे काम करण्यास भाजप कार्यकर्त्यांचा नकार

हॅलो जनता, (जळगाव) –
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे दौरे करण्यात व्यस्त असून महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्र विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्यावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिक्का मोर्तब केले आहे.
नुकत्याच नाशिक येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजपचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची बैठक घेवून जुने वाढ विसरून महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल त्याच्यासाठी प्रामाणिक पणे काम करण्याच्या सूचना दिला आहेत. नाशिक येथील बैठक झाल्यानंतर जळगाव येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्षांच्या उपस्थित घेण्यात आली असून यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सूचना या जिल्हाध्यक्षांची सर्वांसमोर मांडल्या नंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत आम्ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम करणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांना सांगितले आहे.
गेल्या ५ वर्षात जळगाव ग्रामीण मतदारसंघात पालकमंत्र्यांनी दिला प्रचंड त्रास…
आज विधानसभा निवडणूक आल्यानंतर त्यांना महायुती आठवली मात्र गेल्या ५ वर्षापासून भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला असल्याची कैफियत भाजप पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षाकडे मांडली.
गेल्या ५ वर्षात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अपात्र करण्यासाठी प्रयत्न करणे, निधी वाटपात दूजाभाव करणे, गावातील विकास कामांचे भूमिपूजन करताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना न बोलावणे असे अनेक प्रकार केले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम करणार नाहीत असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी समोर कैफियत मांडली आहे. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कशी समजूत काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे….
इतर महत्वाच्या बातम्या….
आमदार सुरेश भोळे यांनी भवानी मातेला जळगावकरांसाठी घातले साकडे, “ही” केली मागणी
सावधान ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने हळहळ…..