एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न

हॅलो जनता न्युज, एरंडोल :
एरंडोल येथील अष्टविनायक मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी, हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभाबाबत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट वितरणाचे आयोजनही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि शंकराची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यात एरंडोल आमदार मृणाली अमोल पाटील यांच्या पत्नी, शिवसेना तालुका अध्यक्ष रवी पाटील, नगरसेवक मनोज पाटील, भावी नगरसेवक अतुल मराठे, पी एम विश्वकर्मा योजना मार्गदर्शक हेमराज सोनवणे सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे डिजिटल जिल्हाध्यक्ष प्रमोद राजेंद्र रुले, तसेच महिला नेत्यांमध्ये सौ कल्पनाताई प्रवीण बुंदेले, सौ माधुरी ताई भोलाणे, सौ बेबी ताई सूर्यवंशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मृणाली ताई पाटील यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “आपल्या अडचणींसाठी आमच्या संपर्क कार्यालयाशी संवाद साधा, आम्ही तुमच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असू.” तसेच, महिलांना भरभरून मतदानासाठी त्यांनी आभार व्यक्त केले.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम मृणाली ताई पाटील यांच्या हस्ते पार पडला, आणि महिलांना गिफ्ट वितरित केले. हेमराज सोनवणे सर यांनी बांधकाम कामगार योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली, ज्यात या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, माधुरी ताई भोलाणे यांनी महिलांना सक्षम होण्याचे महत्व सांगितले.
प्रमोद रुले यांनी पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल मार्गदर्शन केले आणि रवी पाटील यांनी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनीषा ताई वाघ, वेदिका ठाकूर आणि त्यांच्या सहकारी महिलांनी खूप परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रमोद रुले यांनी केले, आणि आभार प्रदर्शन मनीषा ताई वाघ यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला, आणि एरंडोल शहरातील विविध कॉलनींतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा