हॅलो सामाजिक

विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

हॅलो जनता न्युज, जळगाव :

दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पंचवटी इंद्रकुंडे येथील पंडित पलुस्कर सभागृहात ‘गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी निर्माता विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि विश्वकर्मा समाज भुषण डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक नारायण शिरसागर, डॉ. सुमित हिरे, शिर्डी साईनाथ हॉस्पिटलचे हार्ट सर्जन डॉ. महेश मिस्त्री, आणि उच्च न्यायालयाच्या वकील एडवोकेट अलका मोरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर, आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून, राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले.

समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि विश्वकर्मा युवक संघटनेचे संस्थापक नारायण राधाकृष्ण शिरसाट यांना ‘समाज रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच फर्निचर क्षेत्रातील शरद गजानन शिरसाट, विश्वकर्मा फ्लावर्स डेकोरेटरचे भूषण गायकवाड यांना ‘आदर्श उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

पत्रकारितेतील योगदानासाठी नाशिक स्टार न्युजचे संचालक विलास रामनाथ सूर्यवंशी, आणि शिर्डी साईनाथ हॉस्पिटलच्या आरोग्य सेविकांना ‘आदर्श आरोग्य सेवक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याशिवाय, आदर्श महिला उद्योजिका, आदर्श पोलीस, आदर्श प्रशिक्षक, आदर्श शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देखील गौरवण्यात आले. यामध्ये माजी पोलीस निरीक्षक, आदर्श शिक्षक, आदर्श वकील, आदर्श डॉक्टर यांचा समावेश होता.

कार्यक्रमात संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सचिन सुरेश आढळकर, जिल्हाध्यक्ष मंगेश अनिल क्षीरसागर, महानगर प्रमुख राहुल सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यकमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांचा उत्साह आणि सहकार्य यामुळे हा सोहळा यशस्वी झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

Amalner : हिंगोणे येथे महिलेचा विनयभंग करत मारहाण

Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button