स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप

हॅलो जनता (प्रमोद रूले) – विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, त्या रोपांचे संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होत असून शालेय जीवनापासून पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात विद्यार्थ्याचा हातभार लागावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना २ हजार विविध झाडांच्या बियांचे वाटप केले आहेत.
श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे विविध झाडांच्या बिया वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना झाडांच्या बिया मध्ये विविध वृक्षांचे बीज वाटप केले. यामध्ये त्यांनी गोळा केलेल्या चिंच, जांभूळ इत्यादी झाडांच्या जवळपास २००० बियांचे वाटप केले. यावेळी शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होत.
सुट्टीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांमार्फत बिया गोळा केल्या. शैक्षणिक संस्थाना वेगवेगळ्या झाडांचे बीज उपलब्ध होऊ शकते व येत्या पावसाळ्यात घरच्या घरी रोपे तयार करून त्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागेल असे मत मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची ७०० ने तर, सोन्यात ४०० रुपयांनी भाववाढ
जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
भुसावळ येथील अभाविप कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील यांनी दिली भेट….