Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

शेतकरी,

“या” ताखेपासून भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला होणार सुरुवात, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती..

हॅलो जनता न्यूज, जळगाव : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५–२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली…

Read Full News

ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची पाचोरा येथील “मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर” सुवर्णपेढीला भेट

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथे आयोजित शारदीय व्याख्यानमाला कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, स्पष्ट भूमिका आणि तंत्रज्ञान विषयातील सखोल ज्ञानासाठी ओळखले जाणारे डॉ. निरगुडकर हे पूर्वी Zee 24 Taas या वृत्तवाहिनीचे संपादक होते. सध्या ते भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत….

Read Full News

🚨 ब्रेकिंग: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा – बन्सीलाल पाटील

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मांडत त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. यात वेरूळी, पहाण आणि खेडगाव (न.व.) परिसरातील शेतकरी बांधवांनी शेती पंपासाठी अपुऱ्या व अनियमित विजेच्या पुरवठ्याबाबत गंभीर समस्या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी – जितेंद्र जैन..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा — देशात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या India AI Impact Summit दरम्यान राजधानीतील भारत मंडपम येथे गोंधळाची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर Indian Youth Congress च्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा दावा करण्यात येत असून, या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: गाळण ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्ट्राचार, गावकऱ्यांची तक्रार… अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात गाळण येथील सुज्ञ नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात १५ व्या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : गोसावी समाजाच्या निवेदनाची आमदारांकडून तत्काळ दखल…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – पाचोरा येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेची दुरुस्ती, स्वच्छता तसेच इतर उपयोगी व्यवस्था करण्यासंदर्भात आज पाचोरा तालुका दशनाम गोसावी समाजाच्या वतीने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. गोसावी समाजाने निवेदन दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ पाचोरा नगर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : आखातवाडे येथील जयकुमार राजपूत यांची CRPF मध्ये निवड, शिवसेनेतर्फे सत्कार

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आखातवाडे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील नवतरुण युवक जयकुमार रविंद्रसिंग राजपूत यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये यशस्वी निवड झाल्याची आनंददायी बातमी समोर आली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे आखातवाडे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read Full News

🛑ब्रेकिंग: जळगावात महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा डंका, दणदणीत विजय

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश मिळाले असून या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेश चव्हाण व शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अचूक नियोजन निर्णायक ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व…

Read Full News

🚨 जळगाव ब्रेकिंग : प्रभाग १३ चा कायापालट करणे हे आपले पहिले ध्येय – प्रफुल्ल देवकर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर.. नितीन सपके आणि सुरेखा तायडे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आता कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. त्यामुळे थेट मतदारांशी त्यांना थेट संवाद साधता येत आहे. मतदारांचे प्रश्न तसेच अडचणी त्यांना जाणून घेता येत आहेत. प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीने आपली…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION