Headlines

🚨 ब्रेकिंग: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा – बन्सीलाल पाटील

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मांडत त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली.

यात वेरूळी, पहाण आणि खेडगाव (न.व.) परिसरातील शेतकरी बांधवांनी शेती पंपासाठी अपुऱ्या व अनियमित विजेच्या पुरवठ्याबाबत गंभीर समस्या मांडल्या. वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा पुरवठा आणि ठराविक वेळेत वीज न मिळाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या समस्येमुळे आर्थिक ताण वाढत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच वडगाव टेक रेल्वे मोरीजवळील क्रॉसिंग संदर्भातही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी सुरक्षेची अपुरी व्यवस्था, वाहतुकीची गैरसोय आणि अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (ओबीसी सेल) तथा पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांच्या तर्फे करण्यात आली.

त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (ओबीसी सेल) तथा पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा नेत्या वैशाली सूर्यवंशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधु काटे उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी – जितेंद्र जैन..

🚨 ब्रेकिंग: गाळण ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्ट्राचार, गावकऱ्यांची तक्रार… अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

6,513Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION