Monsoon Update : जळगाव जिल्ह्यात उद्याही पावसाचा यलो अलर्ट ; नागरिकांनी सतर्क राहावे
हॅलो जनता न्युज, जळगाव :
Monsoon Update : भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन्ही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Monsoon Update), २७ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच, जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार आज पाऊस पडला. तर उद्याही २८ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे.
आपत्तीजन्य परिस्थितीत मदतीची आवश्यकता असल्यास, नागरिकांनी जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी टोल-फ्री क्रमांक १०७७ किंवा ०२५७-२२२३१८० वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीबाबत सतर्क राहावे आणि सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
Accident : “भरधाव दुचाकीची धडक: जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी यांची प्रकृती गंभीर”
Raver Crime : जानोरी जंगलात सावदा पोलिसांची धडक कारवाई: चार गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त