जळगाव लोकसभा अध्यक्षपदी युवानेते लखीचंद पाटील यांची नियुक्ती.

युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
भडगाव : शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे निकटवर्तीय, भडगाव शिवसेना गटनेते तथा नगरसेवक आणि युवानेते लखीचंद प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांनुसार योगेश कौतिक पाटील आणि विकास महाजन यांची जिल्हा संघटकपदी, तर राकेश संजय पाटील व मयूर सुधाकर महाजन यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच नितीन देवाजी तायडे, राकेश नाना पाटील यांच्यासह विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रात युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास मदत होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
या नियुक्त्या युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण साळी आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लखीचंद प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा अध्यक्षपदी झालेली निवड ही पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवीन जबाबदारीमुळे लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव लोकसभा मतदारसंघात युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम व संघटनात्मक कार्यक्रमांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



