हॅलो शिक्षण

जेईई मेन्समध्ये यश संजय सोनार यांचे घवघवीत यश

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील 

भडगाव : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जेईई मेन्स सत्र–१ परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. यश संजय सोनार याने ९४.८९ पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यश हा पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक तसेच जुनी पेन्शन संघटनेच्या आरोग्य विभागाचे राज्यप्रमुख संजय सोनार कळवाडीकर यांचा सुपुत्र आहे. इयत्ता दहावीमध्ये ९०.२० टक्के गुण मिळवल्यानंतर यशने पुढील शिक्षणासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध नारायण क्लासेस येथे प्रवेश घेतला होता.

आपल्या यशाबद्दल बोलताना यशने सांगितले की, नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले. “सततचा सराव आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली ठरली,” असेही त्याने नमूद केले.

लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली शिंदे यांनी सांगितले की, “यश हा आमच्या विद्यालयातील अत्यंत अभ्यासू आणि जिज्ञासू विद्यार्थी आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच तो विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेत असे.”

यशने मिळवलेल्या या यशाबद्दल भडगाव परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पालक, शिक्षक आणि मित्रपरिवारातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button