Headlines

भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Oplus_131072

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील 

भडगाव : शहरातील खालची पेठ येथे श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या पर्वकाळानिमित्त ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम बक्षीस रु. २१,०००, द्वितीय बक्षीस रु. १५,००० तर तृतीय बक्षीस रु. ११,००० असे जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता झाले.

आयोजकांनी स्पर्धेचे नियम व अटी जाहीर करत सर्व सामने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक तसेच परिसरातील संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले होते.

क्रिकेटच्या माध्यमातून युवकांमध्ये क्रीडा भावना, एकात्मता आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकता वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. स्पर्धेमुळे शहरातील क्रिडा वातावरणाला चालना मिळणार असल्याची भावना क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.

भडगाव तालुक्यातील तब्बल सोळा संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. अंपायर म्हणून तात्या भाऊ पवार, नाना पाटील, गणेश मोरे व दिपक पवार काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश पाटील, कुणाल पाटील, प्रविण (सोनू) पाटील, रावसाहेब पवार, सुमित मालचे, अरुण पिंपळे यांच्यासह श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळाच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

9,233Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION