💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे भडगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद केली होती.
सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने गिरणा नदीवरील पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे भडगाव-पाचोरा-चाळीसगाव या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुलाविषयी गंभीर माहिती समोर आली असून स्थानिक नागरिकांनी पुलाच्या मध्यभागी तडा गेल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
गिरणा पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह, उपाययोजना करण्याची मागणी…
नदीपात्रातील पाण्याची पातळी रात्रीत अचानक वाढल्याने आणि पुलावरून पाणी वाहिल्याने पुलाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने या पुलाची तपासणी करून योग्य दुरुस्तीची उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले असून, अजूनही पाण्याचा जोर काही प्रमाणात कायम असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…
💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….
💥जळगाव : फॉर्म हाऊसवर छापा, माजी महापौर ललित कोल्हे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात…



