Headlines

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात हाहाकार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पूरपरिस्थितीची पाहणी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – तालुक्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चाळीसगाव शहर, नांद्रे गाव, मन्याड धरण तसेच सायगाव परिसराला भेट देऊन पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या पाहणीवेळी आमदार श्री. मंगेश चव्हाण, प्रांताधिकारी चाळीसगाव श्री. प्रमोद दिले, तहसीलदार प्रश्नांत पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

सध्या दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सतत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः नदीकाठच्या भागातील ग्रामस्थांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशी विनंती त्यांनी केली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबीयांसह जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन सेवांना सज्ज ठेवण्यात आले असून, पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक मदत तातडीने पुरविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग: जळगाव पोलिसांचा फार्महाऊस वर छापा, धक्कादायक वास्तव समोर…

💥 ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार का? फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

💥 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

1,590Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION