हॅलो जनता न्यूज, भडगाव : गिरणा व तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे भडगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे नदीला पूर आला असून भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच गिरड-ओझर येथील गिरणा नदीच्या पुलावरही पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भडगाव गिरणा पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त….वाहतूक थांबवली..
या पार्श्वभूमीवर पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नागरिकांना तसेच वाहनधारक व प्रवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गिरणा पुलावर पोलिसांचा बंदोबस्त असून दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पूरस्थिती लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षित ठिकाणी राहण्याची खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जीवित व प्राणहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्यास तात्काळ तालुका व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥जळगाव : फॉर्म हाऊसवर छापा, माजी महापौर ललित कोल्हे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात…
💥 ब्रेकिंग : चाळीसगावात हाहाकार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पूरपरिस्थितीची पाहणी
💥 ब्रेकिंग: जळगाव पोलिसांचा फार्महाऊस वर छापा, धक्कादायक वास्तव समोर…
