हॅलो राजकारण

🚨 ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक २० डिसेंबर २०२५ (शनिवार) व २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सर्व आठवडी बाजार पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी बाजार सुरू असल्यास गर्दी निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस अधिनियम १८६२ चे कलम ५ (अ) व (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

संबंधित नगरपालिकांनी व नगरपंचायतींनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी – आमदार चंद्रकांत पाटील

ब्रेकिंग : धरणगाव येथील पर्यटकांचा उत्तर प्रदेशात अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button