Headlines

🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पाचोरा व भडगाव नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर आज मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर आप्पा पाटील तसेच भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत “या” दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून शहराचे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब या दोन जागांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दि. २ डिसेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या २६ नगरसेवक पदांसह…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक २० डिसेंबर २०२५ (शनिवार) व २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी संबंधित नगरपरिषद…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट, अशा होणार लढती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव – भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता यंदा त्रिपक्षीय लढत पाहायला मिळणार असून, यासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची माघार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार अंतिम रिंगणात कायम राहिले आहेत. तसेच नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे रिंगण तयार झाले आहे. भडगाव : नगराध्यक्ष पदाकरिता त्रिपक्षीय मुकाबला…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भल्या पहाटे पाचोरा शहरात पोलिसांचे धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा –  शहरात आज पहाटे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ४.०० ते ६.३० या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी आणि २२ कर्मचारी अशा पथकाने शहरातील संशयित परिसर, गुन्हेगारांची ठिकाणे आणि विविध वस्त्यांमध्ये ही…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मंत्री महाजनांनी खडसेंना डीचवले, कोण ओळखतो त्या खडसेला?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगावमध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकांवरून आपले कट्टर राजकीय विरोधत एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत सध्याच्या घडीला त्यांना कुणीही ओळखत नसल्याचा दावा केला आहे. कोण ओळखतो त्या खडसेला? ते सध्या कोणत्या पक्षात आहेच कळत नाही, असे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर

हॅलो जनता न्यूज, चोपडा – आगामी चोपडा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने साधना नितीन चौधरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा व परवानगी घेऊन ही घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नेता जीवन चौधरी यांच्यासह पक्षाचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई सुरू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार व त्यांच्या पथकाने शहरात व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. पाचोरा शहरातील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: भडगावात परिवर्तन मेळावा, अंतर्गत गटबाजीचे भाजप नेत्यांसमोर आव्हान

हॅलो जनता न्यूज, भडगाव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या निवडणुकांमध्ये भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या या तयारीचा एक भाग म्हणून आज भडगाव येथे भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आज लक्ष्मण…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION