Headlines

🔴ब्रेकिंग : भडगावात भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा : विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

हॅलो जनता न्यूज, भडगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज भडगाव येथे भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा आज लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता होणार असून, या मेळाव्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या परिवर्तन मेळाव्यात विविध पक्षातील मान्यवर आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना (शिंदे गट), अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, तसेच महाविकास आघाडीतील अनेक नगरसेवक आणि स्थानिक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून घेतलेला हा मेळावा स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार असून, पक्षात नव्या दमाचे कार्यकर्ते दाखल झाल्याने संघटन अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून, शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेत उमेदवारांची गर्दी, इतक्या जणांनी दिल्या मुलाखती

जळगाव रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा

पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

1,163Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION