हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : आगामी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेला वेग आला आहे. त्यातच आज माजी आमदार दिलीप वाघ यांचे सुपुत्र भूषण दिलीप वाघ यांनी प्रभाग क्रमांक १ (ब) मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भूषण वाघ यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. भूषण वाघ हे माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र असून कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. तरुण आणि उत्साही नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये त्यांनी केलेले प्रचाराचे नियोजन आणि पक्षाचा मजबूत गट पाहता भाजपला या प्रभागात चांगली ताकद प्राप्त झाली आहे.
दरम्यान, याच प्रभागात शिवसेना (शिंदे गट) कडूनही तगडे उमेदवार मैदानात उतरले असून, भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार स्थानिक पातळीवर लोकप्रिय असल्याने ही लढत अतिशय तुल्यबळ आणि रोमहर्षक ठरणार आहे. स्थानिक राजकारणात वाघ कुटुंबाचा प्रभाव आणि भाजपची संघटनात्मक ताकद एकीकडे, तर शिवसेनेचा स्थानिक जनाधार दुसरीकडे अशा पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक पाचोऱ्यातील लक्षवेधी केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रभागातील लढत केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित राहणार नाही, तर ती पाचोऱ्यातील भाजप-शिवसेना शक्तीपरीक्षेचा कस ठरणार आहे. आगामी काही दिवसांत प्रचारयुद्धाची रणधुमाळी अधिक रंगणार असून, मतदार कोणाच्या बाजूने झुकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग: भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या भाजप संपर्कात
🚨 पाचोरा ब्रेकिंग: भाजपची नवी राजकीय खेळी : मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादी सोबत युती
🚨 पाचोरा ब्रेकिंग: महाविकास आघाडीकडून यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्या, जनतेची मागणी…
