Headlines

🚨 ब्रेकिंग : मुस्लिम मतांचे गणित : चोपडा शहरात शिवसेना शिंदे गटाची मोठी खेळी यशस्वी होणार का?

हॅलो जनता न्यूज, चोपडा प्रतिनिधी : – चोपडा नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शहरात शिवसेना शिंदे गटाच्या “मोठ्या राजकीय खेळी”ची जोरदार चर्चा रंगत आहे. विशेषत: मुस्लिम मतांच्या समीकरणावर लक्ष केंद्रीत करत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे काँग्रेसकडून युती किंवा छुपा पाठिंबा घेण्याच्या तयारीत असल्याच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

चोपडा शहरात भाजपचा वाढता प्रभाव – संपूर्ण गणित बदलले

यंदाच्या निवडणुकीत भाजप हा निर्णायक पक्ष ठरणार असल्याचे संकेत राजकीय विश्लेषक देत असून त्यामुळे चोपड्यातील पारंपरिक गणित पूर्णपणे बदलले आहे. भाजपचा वाढता जनाधार, संघटनेची वाढलेली कक्षा आणि स्थानिक पातळीवरील मजबूत नेतृत्वामुळे इतर सर्व पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.

चोपडा नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाची सत्ता राखण्यासाठी धडपड

चोपडा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट सरकार स्तरावरून प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. भाजपविरुद्ध मजबूत लढत उभी करण्यासाठी मुस्लिम मतांची आवश्यकता — हे समीकरण लक्षात घेऊनच काँग्रेससोबत हातमिळवणीचा पर्याय पुढे आल्याची चर्चा आहे. शहरात राजकीय चर्चा अशी की, मुस्लिम मतदारसंख्येच्या माध्यमातून भाजपचा मेळ थोपवण्यासाठी शिंदे गटाला काँग्रेसची गरज, काँग्रेसलाही भाजपविरोधी फ्रंट मजबूत करायचा असल्याने पाठिंबा देण्याची शक्यता, युती जाहीर न करता ‘तांत्रिक पाठिंबा’ देण्याचाही पर्याय समोर असल्याचे बोलले जात आहे.

या घडामोडींमुळे चोपड्यात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र काँग्रेसच्या संभाव्य पाठिंब्यामुळे हा सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे चोपडा शहरातील नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगल्या आहेत.“नेमकं कोण कुणासोबत?”“शेवटच्या क्षणी कोणते डावपेच उलगडणार?”

निवडणुकीची धामधूम वाढत असून पुढील काही दिवसांत सर्व पक्षांकडून महत्त्वाच्या घोषणा, तांत्रिक युती आणि रणनीतीत बदल दिसून येतील, असा अंदाज आहे.चोपडा नगरपालिकेचे राजकीय चित्र अतिशय रोचक बनले असून आगामी घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग: भूषण वाघ यांनी प्रभाग क्र. १ मधून भरला उमेदवारी अर्ज

🚨 ब्रेकिंग: भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या भाजप संपर्कात

🚨 पाचोरा ब्रेकिंग: भाजपची नवी राजकीय खेळी : मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादी सोबत युती

4,542Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION