Headlines

🚨 ब्रेकिंग: भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या भाजप संपर्कात

हॅलो जनता न्यूज, भडगाव – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पाचोरा-भडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत आता नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना (शिंदे गट) कडून सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी रेखा मालचे यांचे नाव जाहीर केले. या घोषणेनंतर भडगावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आता शिंदे सेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात भाजप पदाधिकारी असून त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न सध्या भडगाव मध्ये सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून समोर आली आहे.

भाजपकडून अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नसल्याने शहरात राजकीय चर्चा जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या काही इच्छुक उमेदवारांसोबत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संवाद साधल्याचे वृत्त मिळत आहे. त्यामुळे भाजपला आता पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणे की नव्या “आयात” उमेदवारांना प्राधान्य देणे, हा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेने प्रचारयंत्रणा वेगाने सुरु केली आहे. नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. तर भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप होणं बाकी असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत राजकारणाचे समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील काही दिवसांत भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांतील उमेदवारीची घोषणा झाल्यावरच भडगाव नगरपालिकेची निवडणूक कोणाच्या बाजूने झुकते हे स्पष्ट होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

🚨 पाचोरा ब्रेकिंग: भाजपची नवी राजकीय खेळी : मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादी सोबत युती

🚨 पाचोरा ब्रेकिंग: महाविकास आघाडीकडून यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्या, जनतेची मागणी…

🚨 ब्रेकिंग : भडगावमध्ये भाजपला मोठा धक्का! यांचा शिवसेनेत प्रवेश

7,017Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION