Headlines

🚨 पाचोरा ब्रेकिंग: भाजपची नवी राजकीय खेळी : मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादी सोबत युती

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच स्थानिक राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी “स्वबळाचा नारा” देत भाजपासोबतची युती मोडल्याची घोषणा केली होती. यानंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत. आता या पार्श्वभूमीवर भाजपने मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एक नवी राजकीय खेळी खेळल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपने पाचोर्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत युती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुस्लिम मतदारसंख्या निर्णायक ठरणाऱ्या काही प्रभागांत भाजपकडून थेट उमेदवार न देता राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या “घड्याळ” चिन्हावर उमेदवार उभे करण्यात येत आहेत, अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे.

पाचोरा निवडणूक : मुस्लिम मतांसाठी ‘घड्याळा’वरचा विश्वास

पाचोर्‍यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून, गेल्या काही निवडणुकांमध्ये हा मतदारवर्ग शिंदे सेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे झुकलेला दिसला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मुस्लिम तसेच दलित मतदारांचा पाठिंबा फारसा मिळाला नाही. त्यामुळे यावेळी भाजपने रणनीतीत मोठा बदल करत राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत हातमिळवणी करून या मतदारवर्गाला साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पाचोरा निवडणूक : ‘भाजप विरुद्ध शिंदे सेना’ अशी प्रतिष्ठेची लढत

नगरपालिकेच्या या निवडणुकीत पाचोर्‍यात सरळ भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढत रंगणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून, आमदार किशोर पाटील यांनी आपल्या स्वबळाच्या भूमिकेवर ठाम राहत भाजपपासून अंतर ठेवले आहे. दुसरीकडे भाजपनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक स्तरावर “राजकीय युतीपेक्षा मतदानाचा गणिती प्रयोग” राबवला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

पाचोरा निवडणूक : राज्यभरातून लागलेले लक्ष

पाचोरा हे राज्यातील ते पहिले शहर ठरले जिथे शिंदे सेनेच्या आमदाराने उघडपणे भाजपसोबतची युती तोडली. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष सध्या पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक सत्तेसाठीच नव्हे, तर भविष्यातील शिंदे गट–भाजप संबंधांवरही परिणाम करू शकतो, असे मानले जात आहे.

भाजपची ही नवी खेळी यशस्वी ठरणार की शिंदे सेनेचा स्वबळाचा नारा मतदारांना भावणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी पाचोर्‍यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे आणि मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने झुकतात, हे ठरवणार आहे आगामी नगरपरिषदेचे राजकीय गणित.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 पाचोरा ब्रेकिंग: महाविकास आघाडीकडून यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्या, जनतेची मागणी…

🚨 ब्रेकिंग : भडगावमध्ये भाजपला मोठा धक्का! यांचा शिवसेनेत प्रवेश

🚨 पाचोरा ब्रेकिंग: प्रभाग क्र. १० मधून शिवसेनेच्या जयश्री पाटील आणि ॲड. योगेश पाटील (दादू वकील) निवडणुकीच्या रिंगणात, प्रचाराचा शुभारंभ…

5,027Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION