हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक १० मधून जयश्री पाटील आणि ॲड. योगेश पाटील उर्फ दादू वकील यांनी आपला प्रचार शुभारंभ शाहूनगर येथील साईबाबा मंदिरात नारळ फोडून केला. शुभारंभाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
या वेळी आमदार किशोर पाटील, पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रकाश भोसले, भारत खंडेलवाल आणि गोविंद देवरे, युवा नेते सुमित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड. योगेश पाटील (दादू वकील) यांनी सांगितले की, “आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १० मध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे झाली आहेत. नागरिकांच्या समस्या समजून घेत आम्ही त्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या पाठीशी स्थानिक जनता ठामपणे उभी आहे.”
पाचोरा निवडणूक : प्रभागातील उमेदवार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण….
प्रभाग क्रमांक १० मध्ये स्थानिक रहिवासी असलेल्या दोन्ही उमेदवारांविषयी मतदारांमध्ये प्रचंड विश्वास आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचा झेंडा या प्रभागात पुन्हा एकदा फडकवण्यासाठी जयश्री पाटील आणि दादू वकील समर्थकांसह उत्साहाने प्रचारात उतरले आहेत. प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर भव्य रॅली देखील प्रभागातून काढण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी इतक्या उमेदवारांचे अर्ज
🔴ब्रेकिंग : चोपडा निवडणुकीत नवे राजकीय गणित; शिंदे गट–काँग्रेस युतीच्या चर्चेला उधाण
