हॅलो सामाजिक

कजगाव नगद रोडवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीला सुरुवात.

कजगाव प्रतिनिधी : जगदिश अमृतकर

कजगाव येथील नगद रोड परिसरात पावसामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता आता संबंधित ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी सी.सी. कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत होत्या. विशेषतः पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

आता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिक व वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुरुस्तीचे काम दर्जेदार पद्धतीने करून रस्ता पुन्हा खराब होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसाळ्यात रस्त्यांची नियमित पाहणी करून उर्वरित खड्ड्यांचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button