या प्रसंगी ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. लखीचंद पाटील, नगरसेविका सौ. समीक्षा पाटील, पिंटू मराठे, जहांगीर मालचे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा पॅटर्न : एकहाती सत्ता; भाजपचा धुव्वा
पाचोरा व भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा दणदणीत पराभव करत एकहाती सत्ता मिळवली आहे. स्थानिक पातळीवरील संघटनबांधणी, विकासाभिमुख राजकारण आणि जनतेशी असलेली थेट नाळ यामुळे शिवसेनेला हे यश मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या निकालानंतर संपूर्ण राज्यात ‘पाचोरा–भडगाव पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पॅटर्न इतर ठिकाणीही अनुकरणीय ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य : उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. “जनतेच्या विश्वासावर उभे राहून केलेले कामच निवडणुकांमध्ये यश देत असते. पाचोरा आणि भडगावमध्ये शिवसेनेने केलेले विकासकाम आणि संघटनशक्ती याचे हे फळ आहे,” असे त्यांनी सांगितले.
विद्यमान नगराध्यक्षांचा विकासाला गती देण्याचा निर्धार
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनिताताई पाटील व सौ. रेखाताई मालचे यांनीही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द दिला. या विजयामुळे पाचोरा व भडगाव तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व अधिक भक्कम झाले असून, आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश
ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश…
Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…
