Headlines

🚨जळगाव ब्रेकिंग: भाजपा ५७ च्या खाली, सेना २५ नक्की मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काय?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – मुंबई येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच. राज्यात भाजप, शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही पक्षांनी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंड पार्क येथे बैठक घेवून ‘युती निश्चीत केल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षाची युती झालेली असली तरी जागा वाटप जाहीर झाले नसल्याचे दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. तिसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ठाम असल्याचे समोर आले आहे.

जळगावात महायुतीच्या बैठकीत काय घडले?

भाजप सेनेची युती जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जागा वाटपाची चर्चा झालेली आहे, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटप जाहीर करण्यास नकार दिला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी तडजोड करीत ५७ पेक्षा कमी जागा घेण्यास मान्यता दिली असून शिवसेनेला २५ जागा निश्चीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जळगाव महायुती बैठक : महायुतीची घोषणा

जळगाव येथील हटिल प्रेसिडेंट पार्क येथे भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, विष्णू भंगाळे उपस्थित होते. तर भाजपतर्फे खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, दिपक सूर्यवंशी उपस्थित होते. तब्बल दीड तास दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्च झाली, यावेळी दोन्ही पक्षांनी ‘युती करण्याचे घोषीत केले. मात्र जागा वाटपाबाबत सहमती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मात्र या बैठकीत सहभागी करण्यात आले नाही. दोन्ही पक्षात सहमती इाल्यानंतर भाजपा व शिवसेना यांची युती झाली आहे. त्या दोघांनी चर्चा करून त्यानंतर आमच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी कळविले होते. त्यानुसार आमची लवकरच बैठक होईल. सन्मानपूर्वक जागा दिल्यास आम्ही महायुतीत सहभागी होऊ, अन्यथा आम्ही आमच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सांगितले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द…

शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

🚨 ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश…

9,388Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION