Headlines

🚨 ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – दि. २० डिसेंबर २०२५ रोजी डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा (ता. पाचोरा) येथे विद्यार्थ्यांसाठी “आजची स्त्री आत्मनिर्भर आहे / नाही” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक सादरीकरण करत स्पर्धेतील तीनही प्रमुख पारितोषिकांवर आपले नाव कोरले आणि विजयी हॅट्रिक साधली.

या स्पर्धेत तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. गायत्री श्रीकृष्ण क्षिरसागर हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिच्या मुद्देसूद मांडणीने, प्रभावी भाषाशैलीने आणि विषयाची सखोल समज दाखवत परीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्याचप्रमाणे तृतीय वर्ष कला शाखेचीच विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने उत्कृष्ट युक्तिवाद सादर करत द्वितीय क्रमांक मिळवला. तर अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. दिशा दिनेश पाटील हिने आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या यशामागे संघप्रमुख म्हणून डॉ. अतुल सूर्यवंशी आणि प्रा. स्वप्निल भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना विषयाची योग्य दिशा, सादरीकरण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक प्रा. डॉ. जे. पी. बडगुजर तसेच सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी विजयी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक व स्पर्धात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवा मान मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…

अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड..

पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली…

9,870Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION