Headlines

🛑 ब्रेकिंग : ठाण्यावरून रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

हॅलो जनता न्यूज, मुंबई, दि. ७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी अ.शा.प.क्र. एईओ-११२५/५/२०२५/भाप्रसे-१ या क्रमांकाने हा आदेश निर्गमित केला असून, आदेशावर अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या आदेशानुसार, श्री. घुगे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे त्वरित सोपवावा आणि जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाप्रसे यांच्याकडून स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बदलीनंतर रूजू अहवाल Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यभार हस्तांतरण करताना शासनाने दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. नवीन पदावर रूजू झाल्यानंतर पूर्वीच्या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत, असेही निर्देश आहेत. या आदेशाची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी महसूल व वन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, नाशिक व कोकण विभागीय आयुक्त, तसेच श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांना पाठवली आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव कार्यालयांनाही आदेशाची प्रत माहितीस्तव देण्यात आली आहे.

ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री. रोहन घुगे यांनी प्रशासनिक पातळीवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आता ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून, त्यांच्या नवीन कार्यकाळाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 ब्रेकिंग : ठाण्यावरून रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

🛑 ब्रेकिंग : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २० कार्यालयाच्या भूमिपूजनावरून राजकीय वाद, जिल्ह्यातील मंत्र्यांना डावलून सावकारेंचे “सोलो क्रेडिट

🚨 ब्रेकिंग : जळगावात देवी विसर्जन मिरवणुकीत तुफान हाणामारी; १३ जण जखमी

3,790Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION