Headlines

🚨 ब्रेकिंग : जळगावात देवी विसर्जन मिरवणुकीत तुफान हाणामारी; १३ जण जखमी

हॅलो जनता न्यूज, एरंडोल, दि. ६ ऑक्टोबर – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोमवारी सायंकाळी भीषण हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला. दोन गटांमध्ये झालेल्या या मारामारीत एकूण १३ जण जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस दल सतर्क आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवी विसर्जन मिरवणुकीत धक्काबुककीच्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. क्षणातच हा वाद चिघळत मोठ्या हाणामारीत परिवर्तित झाला. दोन्ही गटातील युवकांनी परस्परांवर दगडफेक आणि लाठी-काठ्यांनी हल्ला केल्याने काहींच्या डोक्याला आणि हात-पायांना गंभीर दुखापती झाल्या.

या घटनेत दोन्ही बाजूंचे एकूण १३ जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सर्व जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव : रुग्णालयातही तणावपूर्ण वातावरण

उपचारासाठी जखमींना दाखल केल्यानंतर दोन्ही गटातील लोक रुग्णालयात पुन्हा आमनेसामने आले. त्यातून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हापेठ पोलिसांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेनंतर खेडी कढोली गावात पोलिसांचा जोरदार बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त ठेवण्यात येत आहे. या घटनेबाबत माजी पंचायत समिती सभापती मोहन सोनवणे यांनी माहिती देताना सांगितले की, “खेडी कढोली येथे काही वर्षांपासून दोन्ही गटांमध्ये जुने वैमनस्य आहे. याच पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या वेळी किरकोळ वाद उफाळून आला आणि तोच मोठ्या मारामारीत बदलला.” दरम्यान, पोलिसांनी या घटनेत सहभागी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💐 मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ७ हजार लाडक्या बहिणी अपात्र, हे आहेत अपात्रतेचे निकष

3,415Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION