🚨 पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा बसस्थानकावरून कडे वडगाव मार्गावर भीषण अपघात घडला असून, सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा बस डेपोची एस.टी. बस अचानक पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून कडे वडगावकडे जाणारी एस.टी. बस प्रवासात असताना समोरून अचानक वाहन आल्याने बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघाताचा जोर इतका होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले आणि अनेकांना गंभीर दुखापत झाली.
या बसमध्ये शाळेत जाणारे अनेक शाळकरी विद्यार्थीही प्रवास करत होते, ही बाब समोर आल्याने पालकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांच्या किंकाळ्या आणि मदतीसाठीचे आर्त आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ पाचोरा–कडे वडगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बस प्रवासादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
भडगाव नगरपरिषद निवडणूक निकाल, शिवसेनेचा दणदणीत विजय – निकालाचे संपूर्ण विश्लेषण…
🚨 ब्रेकिंग : कोकाटेंच्या जागी कुणाची वर्णी? काय म्हणाले माजी मंत्री अनिल पाटील..




