अनिल पाटलांना मंत्री पदाच्या उत्तम कामाचा अनुभव…
उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावे, अशी मागणी जोर धरत असून, माजी मंत्री अनिल पाटील यांच्या रूपाने या भागाला प्रतिनिधित्व मिळावे, कारण त्यांनी अगोदर मंत्रीपद भूषविले असून त्यात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील – अनिल पाटील..
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “मंत्रिपद कुणाला द्यायचे हे पक्षाचे सर्वेसर्वा आणि वरिष्ठ नेते ठरवतात. सध्या आमचे लक्ष्य मंत्रीपद नसून आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्ता म्हणून पक्षाची ताकद वाढवणे हेच आहे. मंत्रिपदाबाबत निर्णय अजितदादा आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.”
अनिल पाटील यांच्या या संयमित प्रतिक्रियेमुळे त्यांची पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक भूमिका अधोरेखित होत असून, राजकीयदृष्ट्या त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांनी निवडणुकांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट केले आहे. एकंदरीत, मंत्रीपदासाठी अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असला तरी, अनिल पाटील यांच्या नावाभोवती फिरणाऱ्या चर्चांमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात नव्याने हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात अजित पवार यांचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत “या” दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..
ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी – आमदार चंद्रकांत पाटील
