⁠हॅलो क्राईम

💥 ब्रेकिंग : पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली असून, यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार पूर्वीच्या वैमनस्यातून घडल्याचं समजत आहे. गोळीबारानंतर परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. गोळी लागलेला युवक गंभीर अवस्थेत असून त्याला तातडीने पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना पूर्वीच्या वादातून घडल्याचं सांगितलं जात असलं तरी, नेमकी पार्श्वभूमी काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. पाचोरा शहरात भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (सविस्तर बातमी काही वेळात)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button