हॅलो जनता न्यूज, मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकार मोहनलाल यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या असून, “एक अद्वितीय अभिनेता म्हणून भारतीय सिनेसृष्टीस दिलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत गौरव व्यक्त केला.
मोहनलाल यांची चार दशकांची कारकीर्द…
मोहनलाल विश्वनाथन नायर, म्हणजेच ‘ललेटन’ या नावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे हे दिग्गज अभिनेते मागील चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. १९८० साली मंजिल विरिंजा पूक्कल या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांत विविधरंगी भूमिका केल्या आहेत. गंभीर, विनोदी, अॅक्शन, ऐतिहासिक अशा प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय दिला आहे.

मोहनलाल : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान
मोहनलाल यांनी दोन वेळा राष्ट्रीय सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय पद्मश्री व पद्मभूषण या नागरी सन्मानांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. भरतानंयम, वनप्रस्थम्, पुलिमुरुगन, दृश्यम या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला जागतिक पातळीवर दाद मिळाली.
मोहनलाल: भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदावर त्यांची नियुक्ती
केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर निर्माता, गायक, रंगभूमी कलाकार आणि समाजकार्याशी जोडलेला संवेदनशील व्यक्ती म्हणूनही मोहनलाल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे, ज्यातून त्यांचा देशभक्तीचा भावही स्पष्ट होतो.
दक्षिण ते उत्तर – अखिल भारतीय लोकप्रियता
मल्याळम सिनेमा केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असतानाही मोहनलाल यांनी तमिळ, हिंदी, तेलुगू व कन्नड चित्रपटांमध्येही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ केरळपुरती मर्यादित नसून ते खऱ्या अर्थाने ‘राष्ट्रीय कलाकार’ ठरले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. मोहनलाल यांच्या कार्याचा गौरव या पुरस्कारामुळे अधिक च उंचावला गेला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….
🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार….
🌾 ब्रेकिंग : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ
