⁠हॅलो क्राईम

🚨 Big Breaking : भीषण अपघात : डंपरची कार ला धडक, आई व मुलाचा जागीच मृत्यू तर वडील व लहान मुलगा गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १ ऑक्टोबर : जळगाव-चोपडा महामार्गावर विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर रविवारी उशिरा रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चारचाकी वाहनास दिलेल्या जबर धडकेत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार पुलाचे कठडे तोडून सरळ तापी नदीपात्रात कोसळली. अपघातात कुटुंबातील आई आणि मोठा मुलगा जागीच ठार झाला असून वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. जळगावकडून चोपड्याकडे जाणारा वाळूने भरलेला डंपर पुलावरून येणाऱ्या चारचाकीवर आदळला. धडक इतकी भीषण होती की कार थेट पुलाखाली नदीपात्रात कोसळली.

भीषण अपघात : जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात मीनाक्षी निलेश चौधरी व पार्थ निलेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील निलेश चौधरी व ध्रुव चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगाव शहरातील विठ्ठल नगर येथील रहिवासी आहेत. निलेश चौधरी हे शाळेत शिक्षक तर मीनाक्षी चौधरी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

भीषण अपघात : नागरिकांची मदत

अपघाताची माहिती मिळताच विदगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. नागरिकांच्या तत्परतेमुळे दोन जखमींना वाहनातून बाहेर काढून वेळेत रुग्णालयात दाखल करता आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे. धडक झाल्यानंतर डंपर रस्त्यावर आडवा झाल्याने जळगाव-चोपडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही तास वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

ही घटना जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यावर अपघातांचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातामुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या..

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट : एक गंभीर जखमी …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button