Headlines

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील का? की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याचा निर्णय घेतील? या प्रश्नावर जिल्ह्यात आणि राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

अलीकडेच अरुण भाई गुजराथी यांनी धुळे येथे आयोजित लोकनेते, माजी मंत्री स्व. रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गुजराती यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक जोर चढला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीला अरुणभाई गैरहजर…

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या असताना अरुण भाई गुजराथी मात्र या बैठकीत गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे आणि धुळे येथील कार्यक्रमाला उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम वाढला आहे.

पत्रकारांनी पक्षांतरासंदर्भात विचारले असता, “मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करीत आहे,” असे अरुण भाई गुजराथी यांनी पूर्वी स्पष्ट केले होते. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात, अशीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अरुणभाई सक्रिय होणार..

विशेष म्हणजे, चोपडा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाची झालेली घसरण ही कुठेतरी अरुण भाई गुजराती यांच्या रणनीतीमुळे झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुजराती यांच्याकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्या हालचालीवर केंद्रित झाले आहे.

राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अरुण भाई गुजराथी जर भाजपमध्ये प्रवेश करतात तर जळगाव जिल्ह्यातील समीकरणे बदलू शकतात. परंतु जर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो. याउलट, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यास स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे गणित गुंतागुंतीचे होणार आहे. एकूणच, अरुण भाई गुजराथीच्या पुढील पावलाकडे केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट : एक गंभीर जखमी …

💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

8,260Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION