⁠हॅलो क्राईम

🚨चोपडा ब्रेकिंग : भरधाव दुचाकी झाडावर आदळली; मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

हॅलो जनता न्यूज, चोपडा (यश पाटील) │ चोपडा तालुक्यातील मामलदा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय 23) व अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय 22, दोघे रा. मामलदा, ता. चोपडा) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे युवक चोपडा ते मामलदा या रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि ॲम्बुलन्सला संपर्क साधला. स्थानिक ॲम्बुलन्स चालक मामु यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टर सपना पाटील यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

चोपडा अपघात : पृथ्वीराजचा आठ दिवसांनी साखरपुडा होणार होता

दरम्यान, मृतांपैकी पृथ्वीराज हा सुरत येथे रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवत होता. तो काही दिवसांपूर्वीच गावाकडे भेटीसाठी आला होता. त्याने दसऱ्याच्या सणानिमित्त नवीन Yamaha 50 Sport बाईक खरेदी केली होती. तर अमोल हा एका प्रायव्हेट बायो-पेस्टिसाइड्स कंपनीमध्ये काम करत होता. दोघेही भाऊबंदकीचे असून एकत्र राहत होते. विशेष म्हणजे पृथ्वीराजचा आठ दिवसांनी साखरपुडा होणार होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

पाचोरा भडगाव मतदार संघात भाजप शिवसेना युती झाली पाहिजे का? व्यक्त व्हा, तुमचे मत नोंदवा

*खालील लिंकवर क्लिक करा_____👇*

http://youtube.com/post/UgkxXTbB7_VV5VLm7ehuOdZfvm3jGp4OyqBO?si=dzqZMmWkomZCCbPI

या दोघांचा मृत्यू हा कुटुंबावर व गावावर आकाश कोसळल्यासारखा आहे. दोघेही घरातील एकुलते एक पुत्र असल्याने त्यांच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. घटनेनंतर मामलदा गावावर शोककळा पसरली असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑ब्रेकिंग: पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपचा नेता कोण? आगामी निवडणुकांचे निकाल ठरवतील

🛑पाचोरा ब्रेकिंग: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आली जाग, आज रस्ता रोको आंदोलन

🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button