Headlines

🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये मागील काही दिवसांपासून शेकडो झाडांची अनधिकृत तोड सुरू असून, परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विकासाच्या नावाखाली हिरवळ नष्ट करण्याचा हा प्रकार पर्यावरणीय गुन्हा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

🌲 १५० पेक्षा अधिक झाडांची तोड — अजून शेकडो झाडांना धोका

सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी सलीम सखावत खान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देत म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांत १५० पेक्षा अधिक झाडे तोडण्यात आली असून, अजून २०० ते ३०० झाडे तोडण्यासाठी उभी आहेत. या झाडांमध्ये आंबा, जांभूळ, चिंच, सिसम, खैर, निगळ, हिरडा यांसारख्या मौल्यवान प्रजातींचा समावेश आहे.

खाजगी वनक्षेत्रात सुरू निसर्गाची हत्या

सदर जमीन कादिरखान हाजी जोरावरखान यांच्या नावावर असून, सुमारे ४० वर्षांपासून पडीत होती. मात्र, २०२३–२४ मध्ये या जमिनीची नोंद “खाजगी वनक्षेत्र” म्हणून करण्यात आली आहे. या क्षेत्रातील झाडे केवळ हिरवळ नव्हती, तर ती मातीचे आरोग्य, जलसाठा, पक्षी–प्राणींचा निवारा आणि स्थानिक हवामान संतुलन राखणारी होती. त्यामुळे ही तोड थेट पर्यावरणीय संतुलनावर आघात मानली जात आहे.

परवानगीशिवाय झाडतोड — कायदा कुठे गेला?

स्थानिक नागरिकांनी केलेल्या चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, झाडतोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. महाराष्ट्र शासनाची परवानगीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात झाडतोड कशी झाली?” — असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

सदर जमीन अजूनही बिनशेती वर्गात रूपांतरित नाही. त्यामुळे सुरू असलेली झाडतोड कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद ठरत आहे. सलीम सखावत खान यांनी यावर भाष्य करताना सांगितले — “खरा विकास तोच जो निसर्गासोबत सुसंवाद साधतो. झाडे ही नफा देणारी संपत्ती नव्हेत, ती जीवनाची हमी आहेत. विकासाच्या आडनावाखाली निसर्गाचा शोषण करणे हे भविष्यातील पिढ्यांवरील अन्याय आहे.”

🪓 नगरपालिकेची मर्यादित परवानगी, मात्र तोड त्यापेक्षा अनेकपटीने अधिक झाडांची कत्तल

भडगाव नगरपालिकेने केवळ १४ झाडांची तोड करण्यास परवानगी दिल्याचे अधिकृत दस्तऐवजात नमूद आहे. मात्र, स्थानिकांच्या मते आरोपींनी गट क्रमांक ५६२/१ मधूनही १५ ते २० झाडे तोडली असून, रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरमधून लाकूड हलविण्यात आले. नगरपालिकेच्या तोंडी इशाऱ्यांनंतरही तोड सुरू राहिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी वन विभाग, महसूल अधिकारी आणि नगरपरिषद यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 ब्रेकिंग: राहुरी पोलीस पोलिसांचा अनोखा उपक्रम, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम

🚨 राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून केली “ही” मागणी

🚨 रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला प्रारंभ, मुकुंद गोसावी यांनी फित कापून केले उद्घाटन….

587Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION