कजगावात मेडिकलचे शटर उचकून चोरी ; ५ ते ६ हजारांची रोकड लंपास.
मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव. कजगाव, ता. भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री…
