Headlines

कजगावमध्ये डेंग्यूचा उद्रेक ? आठ ते दहा दिवसांत दहा जणांना लागण झाल्याची माहिती..!

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव, ता. भडगाव : गावातील अस्वच्छता, दूषित पाणीपुरवठा आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबतच्या तक्रारींमुळे कजगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत अंदाजे दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर…

Read Full News

कजगांव ग्रामपंचायतीच्या ठरावावर पंचायत समितीचा आक्षेप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव ग्रामपंचायतीने गट क्रमांक १३१/१/३३ मधील जमिनीबाबत केलेल्या ठराव व ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ मधील नोंदीच्या फेरफारावर पंचायत समिती भडगावच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर आक्षेप नोंदविला आहे. सदर जमीन हस्तांतरणास बंदी असताना ग्रामपंचायत स्तरावर नमुना क्रमांक ८ मध्ये हस्तांतरणाची नोंद झाल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात…

Read Full News

कजगावात गणरायाला निरोप ; विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील गणेशोत्सवाची सांगता गणपती विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनासाठी कजगावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, युवक, बालकांसह ग्रामस्थांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या वाहनातून गणरायाची मिरवणूक…

Read Full News

कजगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 30 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त…

Read Full News

ब. ज. हिरण विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय वुशु स्पर्धेसाठी निवड.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत ब. ज. हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या वजन गटात…

Read Full News

पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे कजगांवात उत्साहात आगमन.

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे रविवारी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भव्य गणेशमूर्तीचे…

Read Full News

कजगांव येथे पारंपरिक कुस्तीची दंगल उत्साहात.

मल्लांच्या दमदार डावपेचांना कुस्तीप्रेमींची उत्स्फूर्त दाद ; मैदानावर रंगला मातीतील कुस्तीचा थरार हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्तीची दंगल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या कुस्तीच्या मैदानात कजगावसह परिसरातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनेक मल्लांनी सहभाग घेत आपल्या दमदार डावपेचांचे प्रदर्शन केले. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांसह…

Read Full News

कजगांव येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा.

शेतकरी-बैलांच्या अतूट नात्याला उजाळा; सजविलेल्या बैलांची गावातून मिरवणूक हॅलो जनता प्रतिनिधी जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण कजगांव येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सणानिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सकाळी…

Read Full News

जलजीवन योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण.

कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य पुंडलिक सोनवणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामासह कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास सुरुवात…

Read Full News

चौथ्या श्रावण सोमवारी कजगावात भाविकांना फराळ वाटप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : चौथ्या श्रावण सोमवार निमित्त कजगाव येथे भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. आदेश ग्रुप, कजगाव यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आदेश ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION