Rohit Sharma : रोहित शर्मा रणजी स्पर्धेत 10 वर्षांनी पुनरागमन, मुंबई संघात समावेश

हॅलो जनता न्युज, मुंबई :
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे, आणि न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याचा फॉर्म स्पष्टपणे दिसून आला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला बेंचवर बसण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. फॉर्ममध्ये परतण्यासाठी रोहित शर्मा ने आता देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे आणि यासाठी तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळणार आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) दहा वर्षांनंतर रणजी स्पर्धेत खेळणार आहे, परंतु यावेळी तो कर्णधार म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या १७ खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव आहे, परंतु मुंबई संघाची कर्णधारकी अनुभवी अजिंक्य रहाणेला देण्यात आली आहे. मुंबईचा पहिला सामना २३ जानेवारीपासून एमसीए-बीकेसी ग्राउंडवर जम्मू काश्मीरविरुद्ध होईल.
टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्मा टी20 फॉर्मेटमधून निवृत्त झाला आहे आणि आता तो केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळतो. त्याच्या कसोटी कामगिरीची स्थिती चांगली नाही, आणि वनडे फॉर्मेटमधील भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्यासाठी रणजी स्पर्धेतील सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई संघाचा संघ पुढीलप्रमाणे आहे: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुश कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, हर्ष कोठारी.
Thakare Gat : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ पवार यांनी दिला राजीनामा
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; मुंबई हायकोर्टाने पाच पोलिसांना ठरवले दोषी