Pachora : तात्काळ ट्रांसफार्मर सुरू करा अन्यथा…. पाचोर्यात उद्धव सेना आक्रमक…
हॅलो जनता, प्रतिनिधी – Pachora गिरड रोडवरील वीज उपकेंद्रात मंजूर करण्यात आलेले २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावा, अन्यथा उद्धव सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महावितरणला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना ट्रान्सफार्मर तातडीने बसवण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, गिरड रोडवरील १३२/११ केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रामध्ये सद्यस्थितीत एकच २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर कार्यरत आहे. त्यावर पाचोरा (Pachora) शहराचा बहुतांश भाग, खेडगाव नंदीचे, बिल्दी, सातगाव, हडसन, पहाण, वेरूळी, वडगाव, अंतुर्ली, भातखंडे, परधाडे, खडकदेवळा, जारगाव, चिंचखेडा, सारोळा, वाघूलखेडे, चिंचखेडे वगैरे गावांचा भाग येत असून तेथील ग्राहकांचा विजेचा भार यावरच पडलेला आहे. यामुळे २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर तातडीने बसून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. वीज वितरण खात्याने तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर कार्यान्वित करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावेळी उद्धव सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहन प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपजिल्ह युवा अधिकारी संदीप जैन, अभय पाटील, शशी पाटील व गफार सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Jalgaon : अतीपावसामुळे जिल्ह्यात नुकसान, पालकमंत्र्यांचे त्वरित पंचनाम्याचे आदेश
आनदांची बातमी : लवकरच पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नावावर मूळ मालकाच्या नावावर होणार….