Rabbi Hangam : यंदा रब्बीचा पेरा ७१ हजार हेक्टरने वाढला

हॅलो जनता न्युज, जळगाव :
Rabbi Hangam : जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला असून ऑक्टोबर व डीसेंबर महिन्यातही दमदार पाऊस झाला असल्यामुळे जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा कायम आहे. त्यामुळे या वर्षी रब्बीच्या क्षेत्रात तब्बल ७१ हजार हेक्टरने पेरा वाढला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. तर यंदा जिल्ह्यात ३ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. सरासरी क्षेत्र पहाता यंदा १२९ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या १५ जानेवारी पर्यंत पूर्ण झाल्या असुन याचा अंतिम पेरणी अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. यंदा मका, ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असुन गहुचे क्षेत्र किंचीतसे कमी झाले आहे.
Rabbi Hangam : फरदड फेकून रब्बीवर विश्वास
यंदा अतीपावसामुळे खरीप हंगामाच्या कापसाला फटका बसला असुन दिवाळीनंतर बऱ्याच शेतकऱ्याकडून कापूसाचे क्षेत्र खाली करून रब्बी हंगामावर विश्वास शेतकऱ्यांनी दाखवला आहे. यंदा जादा पावसामुळे सोयाबीन, कापूस या पीकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी कापसाचे फरदळचे उत्पन्न घेणे टाळले आहे. डिसेंबर महिन्यात देखील अवकाळी पाउस झाल्याने यंदा १५ जानेवारी पर्यंत रब्बीच्या पेरण्या झाल्या आहे. अवकाळीने वाढवला रब्बीचा पेरा गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे रब्बीचे क्षेत्र देखील घटले होते. गेल्या वर्षी जिल्ह्यात २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. तर यंदा जिल्ह्यात ३ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात यंदा ७१ हजार हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने यंदा बळीराजाने रब्बी हंगामावर नशिब अजमावले आहे.
मका, हरभऱ्याचे क्षेत्र ही वाढले
गव्हाचे क्षेत्र गेल्या वर्षी ६० हजार ६८४ हेक्टर होते. यावर्षी ते ६० हजार २०० हेक्टरवर गहुचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मकाचे क्षेत्र तब्बल ३५ हजार हेक्टरने वाढला आहे. यंदा १ लाख २ हजार ७९२ हेक्टरवर मका पेरला गेला आहे. ज्वारीचे क्षेत्र देखील ११ हजार हेक्टरने वाढले असुन यंदा शेतकऱ्यांनी ५० हजार ५८६ हेक्टरवर ज्वारी पेरली आहे. हरभरा देखील २८ हजार हेक्टरने वाढला असुन यंदा ९८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात मुबलक बियाणे, खते
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून यंदा मुबलक बियाणांची मागणी करण्यात आली होती. त्यात बहुतंश खतांचा साठा देखील मुबलक झाला आहे. खरीप हंगामाची खते देखील शिल्लक आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षातील रब्बीचे क्षेत्र
वर्ष – लागवड झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
२०२०- २ लाख ४४ हजार
२०२१ २ लाख ४३ हजार
२०२२- २ लाख ४१ हजार
२०२३ २ लाख २७ हजार
२०२४ ३ लाख १२ हजार
Gold Silver Price Today : सोने आणि चांदीत झोका ! सोने 80,000 च्या टप्प्याला पोहोचले
Pune Accident : पुणे जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी