Gold Silver Price Today : सोने आणि चांदीत झोका ! सोने 80,000 च्या टप्प्याला पोहोचले

हॅलो जनता न्युज, मुंबई :
नवीन वर्षात सोने आणि चांदीने (Gold Silver Price Today) जोरदार चढाई केली आहे आणि या धातूंचा दर आकाशाला भिडला आहे. बजेट 2025 आगोदरच सोनं आणि चांदीच्या किमतींनी उंची गाठली आहे. सोन्यासोबतच चांदीने देखील मोठी भरारी घेतली आहे, ज्यामुळे अनेक खरेदीदारांची झोप उडालेली आहे. गेल्या पंधरवड्यात या मूल्यवान धातूंच्या वाढीने खिशावर संक्रांती आणली आहे. दरम्यान, या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूनी जोरदार मुसंडी घेतली आहे.
सोने या आठवड्यात अधिक महागले आहे. 15 जानेवारीपासून ते 17 जानेवारीपर्यंत सोने 1730 रुपयांनी महागले. सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. 14 जानेवारीला 110 रुपयांची घसरण झाली, परंतु 15 आणि 16 जानेवारीला 110 आणि 550 रुपयांनी वाढ झाली. 17 जानेवारीला 650 रुपयांची वाढ झाली आणि यामुळे 22 कॅरेट सोने 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झाली आहे. या महिन्यात चांदी जवळपास 5,000 रुपयांनी महागली. सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी वाढली, आणि 14 जानेवारीला 2,000 रुपयांची घसरण झाली. 15 जानेवारीला 1,000 रुपयांची वाढ आणि 16 जानेवारीला 2,000 रुपयांची वधारली. 17 जानेवारीला चांदीत 1,000 रुपयांची अजून भर पडली. 1 किलो चांदीचा दर 96,500 रुपये इतका झाला आहे.
आता सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,239 रुपये, 22 कॅरेट सोने 72,583 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोने 59,429 रुपये, 14 कॅरेट सोने 46,355 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. 1 किलो चांदीचा दर 90,820 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कर आणि शुल्क नसल्यामुळे, सराफा बाजारात यामध्ये तफावत दिसते.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर (Gold Silver Price Today) 80 हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केला आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे सोन्याचे दर 80,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. जीएसटीसह सोन्याचे दर 82,812 रुपये प्रति तोळा पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात तेजी आल्याने सोन्याचे दर 80,000 रुपयांवर आले आहेत. जाणकारांचा अंदाज आहे की, येत्या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा