Headlines

Rohini khadse : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

हॅलो जनता : (Rohini Khadse) गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा सुरू केली. पावसाळा सुरू झाला की सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात परंतु गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मुर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार सात आठ महिने अगोदर पासुन मेहनत घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या…

Read Full News

Aadity Tatkare : ‘मुख्यमंत्री-माझी बहीण लाडकी योजने’चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक महिलांना लाभ मिळणार

हॅलो जनता : ‘मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने’चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक तर रायगड जिल्ह्यातील दहा लाखाहुन अधिक महिलांना या योजनेचा मिळणार आहे. शेवटच्या घटकातील माता-भगिनीं पर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aadity Tatkare) यांनी केले. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नोंदणी शिबिराचा शुभारंभ मंत्री कु….

Read Full News

Gulabrao Patil : राज्यातील हातपंप/विजपंप देखभाल दुरुस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय !

हॅलो जनता : त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी व नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी सहाय्यक अनुदाने स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासन स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाकडुन वेतन अनुदान मिळणेसाठी हातपंप विजपंप राज्य संघटनेने १९८८ ते २०२४…

Read Full News
Eknath Khadse

Eknath khadse : आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ. एकनाथराव खडसे

हॅलो जनता : शेतकरी बांधवांची तूर खरेदी करताना काही व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकरी बांधवांची लूट करत असल्याबाबत आज आ . एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, तूर खरेदीसाठी शासनाने ठरविलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही काही व्यापारी, संस्था शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी…

Read Full News

Jalgaon : गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

हॅलो जनता : (Jalgaon) ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली. इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या…

Read Full News

Pandharpur Darshan : चाळीसगाव तालुक्यातील १० हजार भाविकांना घडणार पंढरीच्या विठुरायाचे दर्शन

हॅलो जनता : चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची  (Pandharpur Darshan) अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार…

Read Full News

Congress : प्रतिभा शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

हॅलो जनता : उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के सी वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. प्रतिभा यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना नेमकी काँग्रेसमध्ये काय…

Read Full News

Anil Patil : एस.टी.चे वाहतूक नियंत्रक एल. टी. पाटील झालेत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक

अमळनेर : येथील एस टी आगाराचे वाहतूक नियंत्रक तथा महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एल. टी.पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील ( Anil Patil) यांचे शासकीय स्वीय सहाय्यक पदी नियुक्ती झाली असून याबाबतचे पत्र काल रोजी त्यांना प्राप्त झाले. मूळचे अमळनेर तालुक्यातील दापोरी येथील असलेले एल. टी. पाटील हे…

Read Full News

Blood Testing : रोटरी क्लब पाचोरा- भडगाव तर्फे पोलीस बांधवांची रक्त घटक तपासणी

हॅलो जनता (पाचोरा) : येथील रोटरी क्लब पाचोरा -भडगाव व कौसल्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील पोलीस बांधवांच्या रक्त घटकांची तपासणी (Blood Testing )करण्यात आली. “डॉक्टर्स डे” च्या औचित्य साधून या रक्त घटक तपासणी शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी शिवाजी…

Read Full News

Vidhanparishad : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी – आ. एकनाथराव खडसे

हॅलो जनता : एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद (Vidhanparishad) सभागृहात केली. यावेळी ते म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर व इतर तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी,…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION