हॅलो राजकारण

Congress : प्रतिभा शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

हॅलो जनता : उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के सी वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

प्रतिभा यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना नेमकी काँग्रेसमध्ये काय जबाबदारी मिळेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांमध्ये त्या राहुल गांधी सोबत सक्रिय सहभागी होत्या त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी खान्देश मधील प्रामुख्याने नंदुरबार येथील निवडणुकीची प्रचार धुरा सांभाळत रावेर, जळगांव, व धुळे मतदारसंघामध्ये ही महाविकास आघाडीचा प्रचार यशस्वीपने करत धुळे व नंदुरबार येथील उमेदवारांच्या विजयात महत्वपुर्ण कामगिरी बजावली होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे  (Congress) अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची ऑल इंडिया काँग्रेस कमेटीकडे शिफारस केल्या नुसार काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यास मंजुरी देत काँग्रेसचे महासचिव के सी वेणूगोपाल यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना दिले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभा शिंदे यांना हे पद मिळाल्याने जळगांव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळाले असून सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Anil Patil : एस.टी.चे वाहतूक नियंत्रक एल. टी. पाटील झालेत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक

Blood Testing : रोटरी क्लब पाचोरा- भडगाव तर्फे पोलीस बांधवांची रक्त घटक तपासणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button