🚨 जळगाव ब्रेकिंग : शासकीय विश्रामगृहात युतीची बैठक, ठाकरेंच्या सेनेची आचारसंहिता भंगची तक्रार…

जळगाव : कोणतीही बैठक झाली नाही – मंत्री गिरीश महाजन…
जळगाव : नेमकी चर्चा टॉयलेट मधे झाली काही? – संजय सावंत
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या या स्पष्टीकरणानंतरही राजकीय वातावरण अधिक तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “जर बैठक झाली नसेल तर नेमकी चर्चा कुठे झाली? दोन्ही मंत्री टॉयलेटमध्ये चर्चा करत होते का?” असा उपरोधिक सवाल उपस्थित करत त्यांनी शासकीय विश्रामगृहातील कथित बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.
संजय सावंत पुढे म्हणाले की, “राज्यात आचारसंहिता लागू असताना शासनकर्तेच अशा पद्धतीने नियमांचा भंग करत असतील, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? सत्ताधाऱ्यांना वेगळे नियम आणि जनतेसाठी वेगळे नियम हे लोकशाहीला धरून नाही.”
या प्रकरणात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत संजय सावंत यांनी माहिती दिली की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर निवडणूक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…
जळगाव ब्रेकिंग : युतीची बैठक अन् मंत्री गुलाबराव पाटील संतापात निघाले, नेमकं काय घडलं…
अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा – माजी आमदार शिरीष चौधरी
जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…




